पुणे / प्रतिनिधी :
संत ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो भाविक-वारकरी आळंदीमध्ये एकवटले असून, त्यांच्या साक्षीने रविवारी कार्तिकीचा सोहळा रंगणार आहे.
पवित्र इंद्रायणी नदीचा घाट दुतर्फा पूर्णपणे वारकऱ्यांनी भरून गेला असून, इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्याकरिता मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. नदीपात्रात दुर्घटना घडू नये, याकरिता आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफ टीम इंद्रायणी नदी पात्रात बोटीसह सज्ज आहे. वैतागेश्वर मंदिराशेजारील (नदीपलीकडील) दर्शनबारी पूर्णपणे भरली असून, तिची रांग बाहेर अर्धा किलोमीटरच्या पुढे गेली आहे. इंद्रायणीच्या घाटावरती टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-माउलींच्या नामघोषात भाविक वारकरी येत आहेत.
अधिक वाचा : फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा
रस्ते गजबजले
डोक्यावर श्री विठू माउली-संत ज्ञानेश्वर महाजांची मूर्ती, तुळशी वृंदावन, खांद्यावर पताका घेतलेले वारकरी, असे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे. प्रदक्षिणा रस्ता, वडगाव रस्ता, चाकण रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असताना दिसत आहे त्यामुळे आळंदीतील रस्ते गजबजून गेले आहेत.