खानापूर– मोदेकोप जवळील मलप्रभा नदी पात्रातील वजर या ठिकाणी पाय घसरून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यामध्ये ओम दिपक ताशिलदार (वय 20) रा. समर्थ कॉलनी हिंडलगा (बेळगाव) याचा मृत्यू झाला. मोदेकोप (ता. खानापूर) येथे या घटनेत मृत्यू पावलेल्या ओम दीपक ताशिलदार यांचे शेत आहे. जवळून मलप्रभा नदी वाहत आहे. त्या ठिकाणी नदीपात्र खोल आहे.
या ठिकाणी ओम आपल्या अन्य काही मित्रासह फिरायला गेला होता. दरम्यान तो नदीत पडला. पोहता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती अन्य मित्रांनी त्यांच्या घरच्या लोकांना दिली. शनिवारी रात्री लांब काट्या घेऊन त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न झाला. परंतु मृतदेह हाती सापडला नव्हता. रविवारी पहाटे मृतदेह पाण्याबाहेर आला. या घटनेची खानापूर पोलिसात नोंद झाली आहे. खानापूर येथील शासकीय शवागृहात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बेळगाव येथे सांयकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खानापूर येथील पंचायत राज्य इंजीनियरिंग विभाग खात्याच्या कार्यालयात मॅनेजर म्हणून काम पाहत असलेले दीपक तासीलदार यांचा तो मुलगा होय. ओम बीकॉम च्या पहिल्या वर्षात शिकत होता. ओमच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
Previous Articleफडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा
Next Article फडणवीस, शिंदे सत्ता बदलण्यात एक्सपर्ट