Tulsi marriage at Parandham Gulduve Math by female priests
मातृशक्तिद्वारे पौरोहित्य व्हावे ही दिव्य संकल्पना पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी समाजात सुरू केली. आज हिंदू समाज ज्ञानाने व संस्काराने मंडित व्हावा, धर्माविषयीच ज्ञान प्राप्त करून स्वतः संस्काराने मंडित होऊन जीवन आनंदमय बनवावे यासाठी आपल्या संस्कृतीची जोपासना करणे हे खूप महत्त्वाचं आहे. प्रशिक्षित महिलांनी पौरोहित्य करून मातृशक्ति धर्माचरण करण्यासाठी अग्रेसर आहेत हे दाखवून दिले आहे असे प्रतिपादन क्षेत्रिय प्रमुख उपाध्याय सुधाकरजी यांनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने राजाधिराज सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी समाधी स्थान, श्री क्षेत्र परंधाम गुळदुवे – सावंतवाडी महाराष्ट्र येथे प्रशिक्षित महिला पुरोहितांच्या पौरोहित्याखाली तुलसी विवाह सोहळा सुसंपन्न झाला.
सावंतवाडी / प्रतिनिधी