ऑनलाईन टीम / तरुण भारत :
5G Plus service started at Pune Airport भारती एअरटेल या दूरसंचार कंपनीने पुण्यातील लोहगाव विमानतळावर 5G प्लस सेवा सुरू केली आहे. 5G प्लस सेवा सुरू झालेले राज्यातील हे पहिलेच विमानतळ आहे.
भारती एअरटेलचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज मॅथेन म्हणाले, लोहगाव विमानतळावर येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळाच्या टर्मिनलवर हायस्पीड 5G प्लस सेवा मिळणार आहे. आगमन आणि प्रस्थान टर्मिनल्स, लाउंज, बोर्डिंग गेट्स, मायग्रेशन आणि इमिग्रेशन काउंटर, सुरक्षा क्षेत्रे, बॅगेज क्लेम बेल्ट्स आणि पार्किंग एरिया या ठिकाणी प्रवासी त्यांच्या मोबाईलवर जलद गतीच्या सेवेचा अनुभव घेऊ शकतात. 5G स्मार्ट फोन असलेले सर्व ग्राहक त्यांच्या चालू डेटा प्लॅनवर या हाय स्पीड 5G प्लसचा आनंद घेऊ शकतात. सध्याचे एअरटेलचे 4G सिम हे 5G सक्षम असल्यामुळे सिमकार्ड बदलण्याची आवश्यकता नाही.
अधिक वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ईर्टिगाची अज्ञात वाहनाला धडक; सहा ठार
एअरटेलने अलीकडेच बेंगळूर येथील नवीन विमानतळावर 5G प्लसची घोषणा केली आहे. एअरटेल 5G प्लस सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद, सिलिगुडी, नागपूर, वाराणसी, पानिपत आणि गुरुग्राम या शहरांमध्ये उपलब्ध आहे.