6 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
खेड प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा यार्डात ट्रॉक्शन चेंज ओव्हर कामासाठी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.20 ते सायंकाळी 4.55 या वेळेत ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या 6 गाड्या 20 ते 30 मिनिटे विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले.
या ब्लॉकमुळे 20910 पोरबंदर-कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेस व 16345 एलटीटी-तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस रोहा येथे 20 ते 30 मिनिटे उशिराने पोहचेल. 50104 रत्नागिरी-दिवा पŸसेंजर, 12617 मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस, 20923 गांधीधाम हमसफर एक्स्प्रेस व 16346 नेत्रावती एक्स्प्रेस वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटे उशिरा धावणार आहेत. तसेच 10106 सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसला रोहा, एनआयडीआय, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, रसायनी व सोमाटणे येथे थांबे देण्यात येणार आहेत.
जामनगर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसलाही एक अतिरिक्त डबा
कोकण मार्गावर धावणाऱया जामनगर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसला स्लिपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आहे. त्यानुसार 19578/19577 एक्स्प्रेस 18 व 19 नोव्हेंबर व परतीच्या प्रवासात 21 व 22 नोव्हेंबर रोजी एक अतिरिक्त डब्यांची धावणार आहे.