8 फूट 3 इंचाच्या उंचीमुळे ठरला सेलिब्रिटी
जगातील सर्वात उंच व्यक्ती सुल्तान कोसेन चर्चेत आला आहे. कोसेन सध्या जगाच्या भ्रमंतीवर असून उंचीमुळे सुल्तान यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे. त्यांची उंची 8 फूट 3 इंच इतकी आहे. लंब हातांप्रकरणी ते जगात दुसऱया क्रमांकावर आहेत. त्यांचे हात 27.5 सेंटीमीटर लांबीचे आहेत. ब्रिटन, रोमानिया, अमेरिकेच्या दौऱयावर कोसेन पोहोचले असता त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
मागील आठवडय़ात सुल्तान हे ग्लोबल टूर अंतर्गत लंडन येथे पोहोचले. तेथे पोहोचून त्यांनी स्वतःचा देश म्हणजेच तुर्कियेच्या आहार अन् संस्कृतीचे प्रमोशन केले आहे. टूरच्या दुसऱया टप्प्याच्या अंतर्गत ते अमेरिकेत पोहोचले. 39 वर्षीय सुल्तान हे तुर्कियेच्या मारदिन प्रांतातील डेडे येथील रहिवासी आहेत. 13 वर्षांपासून जगातील सर्वात उंच पुरुष म्हणून त्यांना मान मिळविला आहे.
उंची अधिक का
सुल्तानची उंची अधिक असण्यामागे एक्रोमेगली स्थिती कारणीभूत आहे. या स्थितीत कुठल्याही व्यक्तीचे हात, पाय, चेहऱयात पिटय़ुईटारी ग्लँडमध्ये हार्मोनचे अतिरिक्त उत्पादन होते, याचमुळे उंची अधिक होत असते. या आजाराबद्दल मला 1989 मध्ये कळले होते. या आजारामुळे माझी दृष्टीक्षमताही खराब होत गेली. समस्या वाढल्यावर कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे नेले होते. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासण्या केल्या होत्या. डोक्यात पिटय़ुईटारी ग्लँडमध्ये टय़ूमर असल्याने हाडांचा विकास होतो, परंतु शरीर कमजोर होते असे डॉक्टरांनी सांगितले होते अशी माहिती सुल्तानने दिली आहे.
गिनिज बुकमध्ये नाव नेंद
13 वर्षांपूर्वी सुल्तानचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची मुलाखत घेतली होती. जगात प्रत्येक व्यक्ती वेगळ असतो, परंतु तसे पाहिल्यास आम्ही सर्व एक आहोत. लोक जेव्हा मला पाहतात, तेव्हा चांगले वाटते, ते माझ्यासोबत छायाचित्रे काढून घेत असतात असे त्याने म्हटले आहे.
100 हून अधिक देशांना भेट
स्वतःच्या उंचीमुळे चर्चेत आलेले सुल्तान 100 हून अधिक देशांमध्ये जाऊन आला आहे. कोरोना महामारीदमयान त्याला दीर्घकाळ घरातच रहावे लागले होते. महामारीपूर्वी त्याने 127 देशांना भेट दिली होती. सुल्तानच्या गावातील लोक त्याच्यावर प्रेम करतात. सुल्तनाने 2013 मध्ये विवाह केला होता, परंतु काही कारणास्तव तो फार काळ टिकू शकला नव्हता.