नियोजनबध्द कार्यक्रमातून सहा लाख दूध संकलन; वाढीसह गायीचे दूध विक्रीचे आव्हान
संतोष पाटील : कोल्हापूर
वर्षाला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) 105 कोटी रुपये खर्चून रोज 20 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता झाली. महापूर, विधानसभा निवडणुका, राज्यातील सत्तांतर, कोरोना महामारी आदी कारणाने प्रकल्पाचे उद्घाटन झालेच नाही. जुन्या सत्ताधायांना मल्टीस्टेटच्या भरवशावर दूध संकलनवाढीची आस होती. नव्या सत्ताधाऱ्यांपुढे दीड वर्षानंतरही अजून रोजचे सहा ते सात लाख लिटर दूध संकलनात वाढ, प्रभावी मार्केटींगसह चार लाख लिटर गायीचे दूध विक्रीचे मोठे आव्हान आहे. मागील सत्ताकाळाप्रमाणेच सुक्ष्म नियोजनाअभावी 105 कोटींचा प्रकल्प पांढरा हत्ती ठरु शकतो.
गोकुळकडे रोज सरासरी गायीचे दूध साडेसहा लाख लिटर तर म्हैशीचे दूध सात ते साडेसात लाख लिटर संकलित होते. मागील महिन्यापासून घटलेले लाखभर लिटर दुध आता पुन्हा संकलित होत आहे. तीन वर्षापूर्वी गोकुळकडे सरासरी बारा लाख लिटर दूधाचे संकलन होत होते. यामध्ये सरासरी दीड ते दोन लाख लिटर वाढ झाली. अनेक दूध संस्था सत्तातरानंतर गोकुळला दूध पाठवू लागल्या. तसेच विविध कर्ज योजनाव्दारे पशूधन वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना काही अंशी यश आले. म्हैशीचे दूधाला मोठी मागणी असली तरी गायीचे दोन ते तीन लाख लिटर दूध रोज शिल्लक दूध उपपदार्थाकडे वळवावे लागते. याचे पावडरसह इतर उपपदार्थ केले जातात. दूध संकलन वाढवताना म्हैशीचे दूध अधिक मिळवण्यासाठी योजना आखावी लागेल. शेतकऱ्यांना बिनव्याजी भांडवल उपलब्ध करुन दुधातून कर्जाचे हफ्ते फेडीच्या योजनेमुळे रोज किमान तीन लाख लिटर म्हैशीच्या दुधात वाढ होईल, असे तज्ञ सांगतात. मात्र, ही योजना अजून प्रभावीपणे लागू करावी लागेल.
गोकुळ शिरगाव येथे प्रक्रिया केंद्राची क्षमता 10 लाख लिटरची होती. त्यात वाढीव तीन लाख लिटर दुधावर प्रक्रिया केले जात होती. नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड याकेंद्रीय संस्थेकडून 85 कोटी कर्ज आणि उर्वरित 20 कोटी स्वभांडवल असे 105 कोटी रुपयांचे खर्चून प्रकल्पाचे दुप्पट क्षमेतेइतके विस्तारिकरण सप्टेंबर 2019 पूर्ण झाले. त्याअनुषंगाने जिह्यातील इतर चिलींग सेंटर आणि पावडर उपपदार्थ करण्याची क्षमताही वाढवली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्प उभारणीनंतर साडेबारा कोटी रुपयांचे अनुदान संघाला मिळाले होते. मात्र, दूध संकलनात वाढ करणे जुन्या सत्तधायांचे स्वप्न संघाचे मल्टीस्टेट रुपांतर बारगळल्याने हवेतच विरले.
सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) सत्तातरापूर्वीच रोज 10 लाखांऐवजी वीस लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता झाली. मागील संचालक मंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची तयारी केली होती. गोकुळ 2019®³ee विधानसभा निवडणुकीपूर्वी एप्रिल महिन्यातील तारीखही ठरली होती. याना त्या कारणाने उद्घाटन कार्यक्रम पुढे गेला. दरम्यान, कोल्हापुरात महापूर आला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. राज्यात सत्तांतरही झाले. नंतर पुढच्याच वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून कोरोना महामारी सुरू झाली. त्यामुळे प्रकल्प उद्घाटन लांबले. प्रकल्प उद्घाटनाविनाच सुरू करण्यात आला.
सध्या गोकुळचे संकलन सरासरी 13 लाख लिटर आहे. गोकुळ शिरगाव येथे प्रक्रिया केंद्राची क्षमता 10 लाख लिटरची आहे. त्यात वाढीव तीन लाख लिटर दुधावर प्रक्रिया यापूर्वीच केली जात होती. नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड याकेंद्रीय संस्थेकडून कर्ज, स्वभांडवल तसेच शासन अनुदान असे 105 कोटी रुपयांचे खर्चून प्रकल्पाचे 20 लाख लिटरपर्यंत विस्तारिकरण झाले आहे. आता 105 कोटींचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार हा खरा सवाल आहे.
नोकरभरतीचा बार शक्य
वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील 624 नोकरभरतीचा वाद मागील वर्षीच मिटला. डेअरची क्षमताही दहा लाख लिटरवरुन वीस लाख लिटर झाली आहे. आकृतीबंध पूर्तता, निवृत्त कर्मचाऱयांच्या जागेवर तांत्रिक कर्मचायांची गरज आहे. गोकुळ व्यवस्थापण व कर्मचारी संघटना यांच्यात 2018 कर्मचाऱयांच्या आकृतीबंधाला संमती दिली आहे. 20 लाख लिटर दैनंदिन दूध संकलन झाल्याखेरीज नवी नोकर भरती करायची नाही, असे करारात नमूद असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे होते.क्षमता वाढल्यानंतर गोकुळमधील 624 नोकरभरतीचा वाद काही वर्षापूर्वीच मिटला. डेअरची क्षमताही दहा लाख लिटरवरुन वीस लाख लिटर झाली आहे. आकृतीबंध पूर्तता, निवृत्त कर्मचाऱयांच्या जागेवर तांत्रिक कर्मचाऱयांची गरज आदी कारणाने 239 नोकरभरतीचा बार उडू शकतो. मागील वर्षी महापूर आणि कोरोनामुळे गोकुळच्या निवडणुकीसह नोकरभरतीचा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता तांत्रिक आणि अतांत्रिक कामगारांच्या जागा उपलब्धतेमुळे गोकुळ नोकर भरतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
सुक्ष्म नियोजनाची गरज
गोकुळ दूध संघाला येत्या काळात अमुल ब्रॅण्डचे कडवे आव्हान असणार आहे. कोल्हापूर पटय़ात उत्कृष्ट दर्जाचे आणि तुलनेत मुबलक दुध उपलब्ध आहे. खासकरुन म्हैसदूध संकलन वाढण्यासाठी गोकुळ व्यवस्थापणाला सुक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. म्हैश खरेदी योजना जाहीर करुन उपयोग होणार नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी नेत्यांपासून संचालक आणि प्रत्येक कर्मचाऱयांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तरच गोकुळसह दूध उत्पादकाची भरभराट होईल.