संतोष सणगर,पेठ वडगाव
पेठ वडगावात पक्षी सप्ताह निमित्ताने करण्यात आलेल्या पक्षी गणनेत 47 प्रकारचे 356 पक्षी आढळले. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गप्रेमी मित्र ग्रुप, पेठ वडगांव यांच्यामार्फत पक्षी सप्ताह दरम्यान पक्षी निरीक्षण, पक्षीगणना करण्यात आली. त्यामध्ये ही माहिती पुढे आली. लोकांच्या फरसाण व अन्य खाद्यामुळे कावळ्यांची वाढलेली प्रचंड संख्या व त्यांचा इतर पाणथळ पक्षांना होणारा त्रास हा निसर्गप्रेमीमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.




गेल्या दहा वर्षांपासून निसर्गप्रेमी मित्र ग्रुप पर्यावरण संवर्धनाचे अनेक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये वृक्षारोपण, तलाव स्वच्छता अभियान, देवराई स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन, फुलपाखरु उद्यान, जागतिक चिमणी दिन उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे पेठ वडगांव व परिसरात जैवविविधता पक्षी, प्राणी, फुलपाखरू इ. संख्या वाढत आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वडगांव व परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यक्रते, राजकीय नेते, शाळा, विद्यार्थी, व्यापारी अशा सर्व स्तरातून लोकांचा सहभाग वाढत आहे.
डॉ. अमोल पाटील,निसर्गप्रेमी मित्र ग्रुप, पेठ वडगांव









