ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Washim Court ordered to file a case under Atrocity against Nawab Malik मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरूंगात असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत. एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांच्या याचिकेनंतर वाशिम कोर्टाने मलिकांवर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱयांनी कारवाईचा बनाव रचल्याचा आरोप मलिकांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो ट्विट करत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक दावेही त्यांनी केले होते. हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं.
अधिक वाचा : शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रीपदं?
कुटुंबियांच्या बदनामीनंतर 24 ऑगस्ट रोजी वानखेडे यांनी वाशीम कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. वानखेडेंच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. त्यामुळे मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येते.