बेळगाव : कोलार येथे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक राज्यस्तरिय ज्युडो स्पर्धेत प्राथमिक गटात मुलांच्या गटात भातकांडे स्कुलचा विद्यार्थी धीरज हवालदार याने 30 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत धीरजने उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात धीरज हवालदारने बेंगळूरच्या शरनचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले.
त्याला ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन तर भातकांडे स्कुलचे चेअरमन मिलिंद भातकांडे व मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









