कोल्हापूर : दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करणारी योजना रद्द करावी या मागणीसाठी दूधगंगा बचाव कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला आहे. कागल, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील शेकडो शेतकरी घोषणाबाजी करत या मोर्चात सहभागी झाले होते.
ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकला आहे. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी हातात घेतलेले फलक लक्षवेधी होते. दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेला यापूर्वी विरोध म्हणून अनेक आंदोलन झाली तरीही राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता आरपारची लढाई लढू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









