ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘Kalyani Kurale Jadhav Passed Away : तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा (Kalyani Kurle Jadhav) कोल्हापूर सांगली महामार्गावर रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिली. यामध्ये कल्याणीचा मृत्यू झाला.
कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. दरम्यान, कोल्हापूर सांगली महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.
हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या सुटकेनंतर ‘त्या’ डीसीपींची थेट वाहतूक शाखेत बदली!









