ध्वनिप्रदूषण करणाऱयांचा ’व्हॉल्यूम कंट्रोल’ आता ग्रामस्थांकडे
प्रतिनिधी/ पणजी
उत्तर गोव्यात किनारी भागात रात्रभर चालणाऱया धिंगाणा पाटर्य़ा आणि त्यातून वाजणारे कानठळ्या बसविणारे संगीत यावर चाप बसविण्यासाठी सरकारने आता खास देखरेख समिती स्थापन केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून चालणाऱया या पाटर्य़ांमधून वाजणाऱया संगीताच्या आवाजामुळे स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यात वयस्क आणि ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थीवर्गाचे जास्त हाल होत होते. कुणालाच धड झोप घेता येत नव्हती तर विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येत होता. ग्रामस्थांकडून त्यासंबंधी वेळोवेळी सर्व संबंधितांकडे तक्रारी करण्यात येत होत्या. परंतु विविध कारणांमुळे कुणीही त्यांची दखल घेत नव्हते. अखेरीस उच्च न्यायालयाला या तक्रारींची स्वेच्छा दखल घ्यावी लागली. त्यातून न्यायालयाने आपल्या निवाडय़ाद्वारे सरकारला देखरेख समिती स्थापन करण्यासंबंधी निर्देश जारी केले होते. त्यानुसार सरकारने उत्तर गोवा जिल्हय़ात किनारी क्षेत्रांमध्ये ध्वनिप्रदूषण (अधिनियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या अंमलबजावणीसाठी देखरेख समिती स्थापन केली आहे.
त्यामुळे आता यापुढे ध्वनिप्रदूषण नियम 2000 चे उल्लंघन करणाऱयांविरोधात तक्रार दाखल करणे ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. त्यानुसार लोकांनी ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंतर्गत नियुक्त देखरेख समिती, संपर्क अधिकारी किंवा प्राधिकरण यांच्याकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानुसार कांदोळी-कळंगुट-बागा परिसरातील लोकांना फ्रान्कोसी डिसोझा – कांदोळी (9890546591), आंतोनिओ डिसोझा-गौरावाडो कळंगुट (9822583182), रंजना सौदागर-सावतावाडा बागा (9822184362) यांच्याकडे तक्रारी दाखल करता येणार आहेत.
हणजुण परिसरातील लोकांना देवानंद शिरोडकर -माझलवाडो (9822150273), दुमिंगो परेरा – डिमेलोवाडो (9822121346) तसेच मांद्रे -मोरजी -आश्वे -हरमल परिसरातील लोकांना प्रसाद शहापूरकर – दांडोसवाडा, मांद्रे (8806441131) आणि निवृत्ती शिरोडकर – गावडेवाडा, मोरजी (9850175509) यांच्याकडे तक्रारी दाखल करता येणार आहेत.
त्याशिवाय पेडणेचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर (9823343429), डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर (9657104353), बार्देश उपजिल्हाधिकारी -1 गुरुदास एस. टी. देसाई (9422394914), बार्देश उपजिल्हाधिकारी -2 यशस्वीनी बी, आयएएस (9731238209), तिसवाडी उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर (9921389999), आणि सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रविण परब (9923700405) यांच्याकडे तक्रारी दाखल करता येणार आहेत. तसेच पणजी, जुने गोवे, आगशी, म्हापसा, हणजुणे, कोलवाळ, पेडणे, मोप, पर्वरी, कळंगुट, साळगाव, डिचोली, वाळपई यातील आपल्या संबंधित भागातील पोलीस स्थानकांचे निरीक्षक/उपनिरीक्षक यांच्याकडेही ग्रामस्थ तक्रारी मांडू शकणार आहेत.









