कडोली/ वार्ताहर
येथील रामनगर गल्लीतील श्री विठ्ठल बिरदेव मंदिरासमोर धनगर बांधवांच्यावतीने नुकतीच कनकदास जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून केपीसीसीचे सदस्य मलगौडा पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षा रेखा सुतार, उपाध्यक्षा रेखा नरोटी, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष राजू मायाण्णा, दत्ता सुतार, प्रेमा नरोटी, ग्राम पंचायत सदस्या गौडाप्पा पाटील, ग्राम पंचायत सदस्य सिद्धू शहापूरकर व सदस्या लक्ष्मी कुटे होते.
पाहुण्याच्या हस्ते कनकदास व क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन करुन नारळ वाढविण्यात आला. त्यानतंर कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी मलगौडा पाटील यांनी कनकदास यांच्या जीवन कार्याबद्दल आढावा घेतला. कनकदास यांनी वेद, कीर्तन व काव्यांतून सामाजिक, समानता व न्याय असा संदेश देत त्यांनी क्रांती घडविली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री विठ्ठल बिरदेव जीर्णोद्धार कमिटीचे पदाधिकारी, कनकदास सेवा समितीसह समाज बांधव उपस्थित होते. गजानन कागणीकर यांनी प्रास्ताविक केले. कल्लाप्पा नरोटी यांनी स्वागत केले. महादेव नरोटी यांनी सूत्रसंचालन तर रमेश कागणीकर यांनी आभार मानले. कनकदास जयंतीनिमित्त ढोलताशा व धनगरी ढोलवाद्यासह रात्री मिरवणूक काढण्यात आली.









