Santosh Ghogale, son of Pikule village, ‘Merit Principal Award’
अहमदनगर जिल्हा येथे नुकताच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाला मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांचा ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ पिकुळे गावचे सुपूत्र तथा दोडामार्ग तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व एम. आर. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कृष्णा घोगळे यांना शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, अहमदनगर शिक्षणाधिकारी अशोक कडूस, महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सेक्रेटरी गुरुदास कुसगावकर, कीर्ति विद्यालय घोटगेवाडीचे मुख्याध्यापक एस. ए. कांबळे, माजी अध्यक्ष श्री. मातोंडकर उपस्थित होते.
दोडामार्ग – वार्ताहर









