सैंधव मीठ हे नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. पण बरेच जण फकत उपवासाच्या पदार्थामध्ये या मिठाचा वापर करतात. पण रोजच्या जेवणात जर या मिठाचा वापर केला तर ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.सैंधव मीठामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम यासह अनेक पौष्टिक पदार्थ असतात. म्हणून हे मीठ खाणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.चला तर मग जाणून घेऊयात याचे आणखीन कोणते फायदे आहेत.
१.सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे मृत त्वचा निघून जाते. तसेच त्वचा तजेलदारदेखील दिसते.
२.वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सैंधव मिठाचा उपयोग होऊ शकतो.आपले वजन वाढले असेल तर आपण आहारात सैंधव मीठाचा समावेश केला पाहिजे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
३.सैंधव मिठामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असल्याने सैंधव मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने टॉन्सिल्सवर आराम मिळतो.
४. पचनसंस्थेच्या सर्व विकारांवर सैंधव मीठ उपयुक्त ठरते. लिंबू पाण्यात हे मीठ घालून प्यायल्यास पोटाचे विकार कमी होऊ शकतात.
५ .दातांचा पिवळटपणा दूर करण्यासाठी या मिठाचा उपयोग होतो. गरम पाण्यात सैंधव मीठ घालून पाणी प्यायल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
६. सैंधव मीठ हे वात,पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी आहे.
(टीप : कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









