Health Tips : खराब जीवनशैली आणि अनहेल्दी डाइट यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो.अनेकांना जेवल्यानंतर जळजळ होण्याची समस्या असते.अनेकांना हलके किंवा जड पदार्थ खाल्यानंतर छातीत किंवा पोटात जळजळ होते. या समस्येवर उपायहा तुमच्या स्वयंपाकघरात असतो. या प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही जळजळीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.
आल्यांचे पाणी प्या
आले आम्लपित्त दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.यामध्ये (Anti-Inflammation) दाहक-विरोधी घटक असतात.जे पचनशक्तीसाठी उपयुक्त असतात.अॅसिडिटीपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही आल्याचा तुकडा चघळू शकता.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते पाण्यात उकळून,गाळून घेऊ शकता.पाणी कोमट झाल्यावर तुम्ही ते पिऊ शकता.
बडीशेप खा
बडीशेप हे नैसर्गिक माऊथ फ्रेशनर आहे. पोटातील गॅस कमी करण्याचे काम बडीशेप करते. जेवणानंतर तुम्ही दररोज बडीशेप खाऊ शकता.यामुळे तुम्हाला जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.रात्री एक ग्लास पाण्यातबडीशेप भिजवून सकाळी गाळून हे पाणी प्यायल्य़ाने देखील तुम्हाला आराम मिळेल.
पिकलेले केळ खा
केळामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जादा असते. नियमित जेवणानंतर जर तुम्ही पिकलेल केळ खाल्ले तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
गुळ खा
पोटातील अथवा छातीतील जळजळ कमी होण्यासाठी तुम्ही रोज जेवनानंतर गुळ खा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.
अॅलोवेरा ज्यूस प्य़ा
अॅलोवेरा ज्यूस पिल्याने देखील अॅसिडीटी पासून सुटकारा मिळू शकतो.
लिंबू पानी
लिंबामध्ये व्हिटामिन सी चे प्रमाण जादा असते. जेवणानंतर एक कप पाण्यात थोडा लिंबाचा रस मिसळा त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी त्यांनी पिऊ शकता.
Disclaimer: यात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Previous Articleहेमश्री चिटणीस ‘नेट-जेआरएफ’ साठी पात्र…
Next Article जीएसएस कॉलेजतर्फे मिराकी युवा महोत्सवाला प्रारंभ









