ढगाळ वातावरण-थंडीमुळे नागरिक त्रस्त : दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढतेय, काळजी घेण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा सप्टेंबरचा पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला आहे. परिणामी हवामानात अनेक बदल घडत आहेत. मागील तीन वर्षांपासून सतत पाऊसच असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून काहीशी थंडी जाणवू लागली आहे. मात्र हवामानाच्या बदलामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
बेळगाव तालुका परिसरात वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. अशातच मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम पिकांवर झाला होता. सध्या बेळगावचा पारा 14.4 अंशावर येऊन ठेपला असून थंडीने नागरिकांना हैराण केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. या वातावरणामुळे मात्र सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे.
ऑक्टोबर हिटचे तापमान असते. मात्र यावषी तसे जाणवलेच नाही. कारण सतत पाऊस असल्यामुळे गारवा गायब झाला होता. यामुळे नागरिकांच्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. यासाठी आपण दक्षता घेणे गरजेचे आहे. अशातच मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली होती. सुरू झालेल्या थंडीमुळे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम काही प्रमाणात जाणवू लागतो आहे. ऑक्टोबर महिन्यांपासून आतापर्यंत या हवामानात काहिसा बदल झाला आहे. यामुळे विशेष करून सर्दी, ताप, खोकला होतो. तर थंडीमुळे सर्दी कमी होत नसल्याने कफ वाढून श्वास घेण्यास त्रास होतो. यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. या वातावरणामुळे अनेकांना दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे.
ग्रामीण भागात शेकोटय़ाही पेटू लागल्या
यावर्षी वारंवार अवकाळी पावसाचे आगमन होतच आहे. कधी पाऊस पडेल याची शाश्वतीच नाही. मध्यंतरी कडाक्याची थंडी पडल्यानंतर अचानक ढग दाटून आले आणि हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत होती. पण या अचानक बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. त्यातच थंडीमुळे अनेक ग्रामीण भागात शेकोटय़ाही पेटू लागल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण गरम कपडे खरेदी करण्याकडेही वळले आहेत. त्याबरोबरच अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आजार बळावणार नाहीत, याची काळजी घेताना दिसत आहेत.
नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच थंडीला जोर
मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत होते. पावसामुळे मात्र शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वीट व्यावसायिकांनाही पावसाचा चांगलाच फटका बसला. खानापूर तालुक्यातील वीट व्यावसायिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक वातावरणाचा फटका सर्वसामान्यांनाच बसला आहे. नोव्हेंबर सुरुवातीपासूनच थंडीने जोर केला आहे. यामुळे शेतकऱयांबरोबरच अनेक जणांना वातावरण बदलाचा फटका बसला आहे.
रुग्णांच्या संख्येत वाढ
यावर्षी हिवाळ्यातही पावसाचे दोन ते तीनवेळा आगमन झाले आहे. आकाशात ढगाळ वातावरण आले की थंडीचा जोर ओसरतो. यामुळे नागरिकांना थंडीची जाणीव अधिक प्रमाणात होताना दिसून येते. यावर्षी मात्र तसे झालेच नाही परत ढगाळ वातावरणात थंडी जाणवत होती. वाढत्या थंडीमुळे अनेक जण घराबाहेर पडण्यासही धजत नाहीत. विशेष करून पहाटे फिरणारे वॉकर्स सकाळी 7 ते 8 च्या सुमारास बाहेर पडत आहे. वातावरणाच्या बदलामुळे मात्र नागरिकांना आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. अनेक दावाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.
नुकतीच कोरोनामुळे मागील दोन वर्षे नागरिकांना घराबाहेर पडता आले नव्हते. उद्योक, व्यवसायांना फटका बसला होता. आता पुन्हा थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे बदलते हवामान कधी थांबणार? अशीच आशा साऱयांना लागून आहे.
पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता
शुक्रवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱयांच्या चिंतेत वाढ झाली असून सध्या पाराही बऱयापैकी आटोक्मयात असून हवामान खात्याने यावर्षी कडाक्याची थंडी पडण्याचे भाकीत केले होते. मात्र आता पुन्हा शुक्रवारपासून ढगाळ वातावरण येईल, असे सांगण्यात येत आहे.