नाचगाण्यासह पार पडते अजब परंपरा
फ्लोरिडामध्ये अलिकडेच मृतांचा वार्षिक दिन अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला. येथे एक मेक्सिकन हॉलिडे असून या दिवशी मिक्टलान (मृतांची प्राचीन एझटेक भूमी) आणि जगामधील प्रवेशद्वार खुले होते असे मानले जाते. या दिवशी एका विशेष काळासाठी स्वतःच्या गमावून बसलेल्या प्रियजनांसोबत नाचगाणे करता यावे म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. लोक स्वतःच्या पूर्वजांसोबत जीवनाचा आनंद व्यक्त करतात अशी मान्यता आहे.
डे ऑफ द डेड हा पूर्वजांची मनधरणी करण्याच्या प्राचीन एझटेक प्रथेला ऑल सोल्स डेसोबत जोडले जाते. स्पॅनिशांनी 1500 च्या दशकाच्या प्रारंभी ही प्रथा मेक्सिकोत आणली होती. या प्रथेला मानणाऱया लोकांनी फ्लोरिडाच्या फोर्ट लॉडरडेलमध्ये मृत उत्सवात भाग घेतला आहे. या दिवशी लोक स्वतःच्या मृत कुटुंबीयांच्या जीवनाचा आनंद व्यक्त करतात आणि त्यांच्या आत्म्याची भेट घेण्याची इच्छा बाळगतात.
हा उत्सव प्रामुख्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी मेक्सिकोत साजरा केला जातो. हा एक प्रकारे कुटुंबाच्या पुनर्मिलनाप्रमाणे आहे. मृत पूर्वज एक अतिथीच्या स्वरुपात येत असल्याचे मानले जाते. उत्सवात भाग घेणारे लोक रंगबिरंगी पेहराव परिधान करतात आणि अनोख्या प्रकारचा मेकअप करतात.
अनेक लोक स्वतःच्या कुटुंबासह उत्सवात सामील होतात आणि त्यांना अजब पद्धतीने पेहराव करायला लावतात. काही लोकांचे पेहराव हे समोरच्या व्यक्तीला घाबरविणारे असतात. या उत्सवादरम्यान 10-18 फूट उंचीच्या विशाल बाहुल्या तयार केल्या जातात.
डे ऑफ द डेड हा पूर्ण दक्षिण अमेरिकेत साजरा केला जाणारा उत्सव आहे. परंतु मेक्सिकोत तो मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. मृत्यू जीवनाच्या यात्रेचा हिस्सा आहे. जीवन समाप्त करणाऱया मृत्यूऐवजी नवे जीवन मृत्यूतूनच असल्याचे प्राचीन मेसोअमेरिकनांचे मानणे होते.









