प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस हायस्कूल आयोजित आंतरशालेय क्रेडेंज महोत्सवात ज्ञान प्रबोधन मंदिर आयसीएसई या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले व सर्वसाधारण अजिंक्मयपद पटकाविले.
प्राथमिक विभागात प्रेरणा भंडारी, ब्रिंदा हट्टीहोळी, वेदिका ओऊळकर, धन्या पाटील, दिया कोटबागी, मन्यु कुलकर्णी यांनी सामूहिक गीतगायन विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला.
वादविवाद स्पर्धेत अंशुमन दागा, गाथा जैन यांनी द्वितीय, प्रश्नमंजुषा स्पर्धेत तनय गिरी, अथर्व शांडिल्य यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. माध्यमिक विभागाच्या दिया भाला हिने मिस पेडेन्ज हा बहुमान मिळविला.
माध्यमिक विभागात गीत गायन स्पर्धेत क्रांती विचारे, अनघा कुलकर्णी, शरयु जोशी, सेजल उंदुरे, वैभवी भट्ट, आर्या कुडतरकर, सुकन्या रेमाणीचे, स्वयम वेर्णेकर यांनी प्रथम, तनिष्क कालशेट्टी व अर्हन प्रभू यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय, शार्क टँक स्पर्धेत जुई चंदगडकर, रिजुल पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर सिनेमॅटोग्राफी स्पर्धेत श्लोक दागा, आरुष कलघटगी, आदेश डुकरे, रश्मिता आजगावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये संकल्प साखरे याने प्रथम तर सरप्राईज इव्हेंटमध्ये अनिकेत पाटील, तन्मय शहापूरकर, भक्ती बस्तवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांना प्रशासक गोविंद वेलिंग व प्राचार्या मंजिरी रानडे यांचे मार्गदर्शन लाभले.









