वृत्तसंस्था/ ब्रेसिला
कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया फिफाच्या 2022 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आतापर्यंत पाचवेळा विजेतेपद मिळवणाऱया बलाढय़ ब्राझील संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी संघाचे प्रमुख प्रशिक्षक ऍडेनोर बॅची यांनी 26 जणांचा संघ जाहीर केला आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ब्राझील फुटबॉल संघाचे नेतृत्व बचावफळीत खेळणाऱया डॅनी अल्वेसकडे सोपविण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर हुकमी स्ट्रायकर रॉबर्टो फर्मिनोला वगळून अनपेक्षित धक्का दिला आहे. बचावफळीत खेळणाऱया डॅनी अल्वेसने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रात आपल्या दर्जेदार कामगिरीने वेगळे स्थान मिळवले आहे. त्याने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये वैयक्तिक 44 विजेतीपदे पटकाविली आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये फुटबॉल सम्राट पेलेपासून ब्राझीलने आपले वर्चस्व बरीच वर्षे राखले. 2002 साली ब्राझीलने पहिल्यांदा फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा ज्ंिाकली होती. ब्राझील संघामध्ये टोटेनहॅमचा रिचर्डसन तसेच वेस्टहॅमचा लुकास पॅक्वेटा यांचा समावेश आहे. दुखापतीमुळे फिलिप कुटीन्होला संघात स्थान मिळू शकले नाही. फिफाच्या विश्वकंरडक फुटबॉल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ब्राझील फुटबॉल संघाकरीता टय़ुरीनमध्ये पाच दिवसांचे सरावाचे शिबिर आयोजित केले आहेत. 19 नाव्हेंबरला ब्राझीलचा संघ दोहाला प्रयाण करेल. कतारमध्ये होणाऱया या महत्त्वाच्या स्पर्धेत ब्राझीलचा सलामीचा सामना 24 नोव्हेंबरला सर्बियाबरोबर होणार आहे. ब्राझीलचा या स्पर्धेत ग गटात समावेश असून या गटामध्ये स्वीत्झर्लंड आणि कॅमेरून यांचाही सहभाग आहे.
ब्राझीलचा विश्वकरंडकासाठी संघ- गोलरक्षक-ऍलिसन, इडेरसन, व्हिव्हेटोन, बचावफळी-ब्रेमेर, इडेर मिलिटो, मारक्विनोस, थियागो सिल्वा, डॅनिलो, डॅनियल अल्वेस, ऍलेक्स सँड्रो, ऍलेकस टेलेक्स, मध्यफळी-ब्रुनो गुमारेस, कॅसिमेरो, एव्हर्टन रिबेरो, फॅबिनो, प्रेड, लुकास, पॅक्वेटा, आघाडीफळी-ऍन्टोनी, गॅब्रियल जिजस, गॅब्रियल मार्टिनेली, नेमार ज्युनियर, पेद्रो, रॅफिना, रिचर्डसन, रॉड्रिगो, व्हिन्सीएस ज्युनियर.









