नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण आता समाप्त झाले आहे. भारतात मंगळवारी दुपारी चार वाजून 23 मिनिटांनी या ग्रहणाचा प्रारंभ झाला होता. संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी ग्रहणमोक्ष झाला. हे ग्रहण एकंदर 1 तास 56 मिनिटे होते. या ग्रहणाचे वेध त्याआधीपासूनच लागले होते. वेध लागल्यापासून ग्रहण मोक्ष होईपर्यंतच्या काळात देशभरातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. ग्रहणमोक्ष झाल्यानंतर पुन्हा मंदिरांचे दरवाजे उघण्यात आले होते.
अरुणालचल प्रदेशातील इटानगर येथे चंद्रोदय पूर्ण ग्रहणासह पाहता आला. दिल्लीत संध्याकाळी पाच वाजून 28 मिनिटांनी, तर मुंबईत संध्याकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाचे दर्शन झाले. भारतात कोलकाता, कोहिमा, पटना, पुरी, रांची आणि इटानगर या सहा शहरांमध्ये हे ग्रहण खग्रास स्वरुपात दिसले. इतरत्र संपूर्ण देशात ते खंडग्रास स्वरुपातच दिसू शकले, अशी माहिती देण्यात आली. एकाच हिंदू महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण येण्याची ही कित्येक सहस1 वर्षांमधील प्रथमच वेळ होती, असेही मत तज्ञांनीं व्यक्त पेले आहे.
2023 मध्ये चार ग्रहणे
2023 मध्ये एकंदर चार ग्रहणे दिसणार आहेत. यांपैकी 20 एप्रिल आणि 14 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असून 5 मे आणि 28 ऑक्टोबरला चंदग्रहण आहे. मात्र, भारतात केवळ एक खंडग्रास चंदग्रहण दिसणार आहे. ते 28 ऑक्टोबरला शरद पौर्णिमेच्या दिवशी असेल. 5 मेच्या चंद्रग्रहणाला धार्मिक मान्यता नाही. पुढचे भारतात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 या दिवशी होईल.









