सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
अवेडे बोरी येथील श्री साईबाबा देवस्थानचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन रविवार 27 ते मंगळवार 29 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह साजरा केला जाईल. सोमवारी साईबाबा मंदिराच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱया प्रशस्त मंडपाचे तसेच आकर्षक शामियान्याचे भूमीपूजन विधीवत करण्यात आले.
गोवा शासनाच्या पंचायत संचालनालयाचे उपसंचालक प्रसिद्ध नाईक यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी महोत्सवी आयोजन समितीचे अध्यक्ष महादेव नाईक, साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष दीपक रायकर, सचिव अक्षय नाईक, गुरुदास नाईक, आनंद तिमणो नाईक, वासुदेव नाईक, नारायण नाईक, मुकेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. दीपक रायकर यांनी स्वागत केले. अक्षय नाईक यांनी आभार मानले.









