खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ, दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /वाळपई
मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाळपई-होंडा दरम्यानच्या रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱया प्रवासी वर्गाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
वाळपई-होंडा हा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचा वापर प्रवासी वर्ग होंडा साखळी, पणजी आदी भागाकडे जाण्यासाठी करत आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने अनेकवेळा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु सदर रस्त्याची परत परत चाळण झालेली आहे. या रस्त्याची लवकरात लवकर कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
साबांखा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच…
जवळपास दीड महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल सरपंच, पंच नगरसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तालुक्मयातील कोणत्याही रस्त्याचे काम रखडणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिना संपला तरी देखील या मार्गावरून प्रवासी वर्गाला अक्षरशः समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वर्क ऑर्डरअभावी काम रखडले
मिळालेल्या अधिक माहितीनुसार या रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयातून वरि÷ अधिकाऱयांना सादर केला असून निविदाही मंजूर झालेली आहे. मात्र अजून पर्यंत वर्क ऑर्डर मिळालेली नाही. यामुळे रस्त्याची दुरुस्ती रखडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱयांकडून प्राप्त झालेली आहे. याचबरोबर वाळपई ते कुंभारखण या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचा प्रस्ताव सादरही केलेला आहे?. सदर प्रस्तावानुसार कामाला सुरुवात झाल्यास हा रस्ता हॉटमिक्सद्वारा डांबरीकरण करण्यात येणार आहे असे यावेळी अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे.
स्थानिक आमदारांनी लक्ष घालावे
दरम्यान वाळपईचे आमदार विश्वजित राणे व पर्ये मतदार संघाचे आमदार डॉ. देविया राणे या सातत्याने याच मार्गावरून प्रवास करीत असतात. त्यांनी विशेष लक्ष देऊन या रस्त्याच्या प्रस्तावाला शक्मय तेवढय़ा लवकर मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.









