बेळगाव : बेंगळूर येथे वायझेड क्लब जपान शुटोकॉन संघटनेतर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे क्लबच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले.
बेंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे क्लबच्या कराटेपटूंनी कटाज व कुमटेमध्ये 14 वर्षाखालील गटात आयुष शिरट्टी, यश पाटील, प्रयाग नायकर, वरद कुलकर्णी, श्रीविना नायक, रिया कामाणे, वंदना कुरूप, सुकरीत गलगली, गगन जक्कण्णावर, वेदांत कोणेरी, तन्मय चिकोपा, रिया वेर्णेकर यांनी घवघवीत यश संपादन केले. या कराटेपटूंना कराटे मास्टर मधू पाटील, प्रसाद पाटील व आकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









