प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील उमरे येथे तरूणाच्या मृत्यूप्रकरणात सदोष मनुष्यवधाच्या गुह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर यांच्यासह 5 जणांविरूद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा प्रस्ताव सरकारी पक्षाकडून तयार करण्यात आला आह़े हा प्रस्ताव राज्य सरकारच्या कायदा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आह़े त्यांच्याकडून मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले.
गुह्यातील माहितीनुसार दिनांक 11 फेबुवारी 2017 रोजी हरचेरी चांदेराई येथील उमरे या गावी दयानंद चौगुले यांना मारहाण करण्यात आली होत़ी यावेळी दयानंद चौगुले यांचा मृत्यू झाला होत़ा सुरूवातीला याप्रकरणी मारहाण करणाऱयांविरूद्ध भादंवि 302 हे कलम लावण्यात आले होत़े दरम्यान चौगुले यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यू हदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे समोर आल्याने झापडेकर व इतर 4 जणांविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा
महेंद्र झापडेकर (ऱा हरचेरी रत्नागिरी) , कुमार शिंदे, महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रणव शिंदे (सर्व ऱा उमरे रत्नागिरी) यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी याप्रकरणी तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठवल़े अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बिले यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला होत़ा सत्र न्यायालयाने झापडेकर व अन्य 4 जणांची सदोष मनुष्यवधाच्य गुह्यातून मुक्तता केल़ी तर किरकोळ मारहाणीच्या गुह्यात न्यायालयाने 6 महिने साधी कैद व 11 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावल़ी या निकालाविरोधात त्यानी उच्च न्यायालयात अपील केले होते.
सदोष मनुष्यवधाच्या गुह्यातील झापडेकर यांच्यासह चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने मृताच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होत़ी त्यानुसार सरकारी पक्षाकडून या प्रकरणाबाबत अपील करण्याचा निर्णय घेण्यात आल़ा गुह्यातील माहितीनुसार दयानंद याचा पुतण्या चिन्मय व आरोपी शिंदे यांच्या घरातील मुलगी यांच्यातील मैत्रीवरून वाद निर्माण झाला होत़ा हा वाद मिटविण्यासाठी शिंदे यांनी चौगुले यांना उमरे येथील आपल्या घरी बोलावून घेतले होत़े दिनांक 11 फेबुवारी 2017 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दयानंद चौगुले हे आपला पुतण्या चिन्मय याच्यासह उमरे याठिकाणी आरोपी यांच्या घरी गेल़े याठिकाणी पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर हे देखील उपस्थित होत़े
या बैठकीमध्ये आरोपी शिंदे व झापडेकर यांनी दयानंद चौगुले व पुतण्या चिन्मय यांना घराचे दरवाजे बंद करून मारहाण केल़ी या मारहाणीत दयानंद हे बेशुद्ध होवून खाली कोसळल़े त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय याठिकाणी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केल़े अशी तक्रार चौगुले यांच्याकडून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली होत़ी त्यानुसार पोलिसांनी सुरूवातीला आरोपिंविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होत़ा
दरम्यान शवविच्छेदन अहवालानुसार दयानंद याचा मृत्यू हदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे समोर आले होत़े त्यानुसार पोलिसांनी 302 हे खूनाचे कलम हटविण्याची मागणी न्यायालला केल़ी तसेच सदोष मनुष्य वधाचे कमल 304 लावण्यात आले होत़े









