राष्ट्रवादी भवनासमोर महिला कार्यकर्त्यांनी पुतळय़ास मारले जोडे
प्रतिनिधी/ सातारा
राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचे तीव्र पडसाद साताऱयात उमटले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी तातडीने सर्व पदाधिकाऱयांना बोलवून घेऊन सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास मंत्री अब्दूल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ास अगोदर महिलांनी जोडे मारुन खाली तुडवत पेटवून दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी निम का पत्ता कडवा है..अब्दूल सत्तार भडवा है, सुप्रियाताई तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत निषेध केला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्री अब्दूल सतार यांनी शिवीगाळ केल्याचे समजताच सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठांकडून सुचना मिळताच लगेच पदाधिकाऱयांना फोनाफोनी झाली अन् राष्ट्रवादी कार्यालयात सायंकाळी 6 वाजता सर्व पदाधिकारी नियोजनबद्द जमले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष संमिद्रा जाधव, स्मिता देशमुख, पूजा काळे, विद्यार्थी सेलचे अतुल शिंदे, गोरखनाथ नलावडे यांच्यासह पदाधिकारी जमले. त्यांनी जोरदार घोषणा देत प्रतिकात्मक मंत्री अब्दूल सत्तार यांच्या पुतळय़ास जोडे मारत पेटवून निषेध नोंदवला.
युवा जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे म्हणाले, बरेचशे नेते खालच्या पातळीवर टीका करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी मध्ये केली होती. हे लोक बघत आहेत. ही संस्कृती नाही. लोक आता शांत आहेत. मतदान पेटीत त्यांचा राग व्यक्त करतील. खालच्या पातळीवर जाऊन टीका अब्दूल सत्तार करतात. त्यांनी राजीनामा द्यावा. बरेच वेळा आमदार म्हणून निवडून आलेत त्यांनी सत्तेचा माज करु नये. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मंत्र्यावर ताबा ठेवला पाहिजे. अशा मंत्र्यांना मंत्रीमंडळातून पहिले हकालपट्टी केली पाहिजे, अशी भावना व्यक्त केले.
संमिद्रा जाधव म्हणाल्या, मंत्री अब्दूल सत्तार यांना खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही. आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल वक्तव्य करतो. त्या माणसाने त्वरीत राजीनामा देऊन खुर्ची खाली करावी, अन्यथा आम्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरुन त्यांची जागा त्यांना दाखवून देवू. असा इशारा दिला आहे.
स्मिता देशमुख म्हणाल्या, अब्दूल सत्तार यांनी जे विधान केले ते अतिशय लज्जास्पद आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघिणी 24 तासात माफी अब्दूल सत्तार यांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात त्यांनी आम्ही फिरु देणार नाही.
सुनील माने म्हणाले, राज्यात खोके सरकार आले आहे. त्या सरकारचा चार महिन्यातला कारभार बघितला तर सरकारवर, सरकारमधील मंत्र्यांवर, आमदारांवर सरकारचे कंट्रोल नाही. प्रत्येक आमदार वेगळय़ा पद्धतीने बोलतोय. त्यांच्याच पक्षाचे आमदार एकमेकांवर आरोप करतात. खोके घेऊन गुवाहटीला गेले असा. अब्दूल सत्तार यांनी संसदरत्न सुप्रियाताई यांच्यावर टीका खालच्या पातळीवर केली. अब्दूल सत्तार यांची राजकीय कारर्किद बघितली आणि सुप्रियाताईंची कारर्किद बघितली कशाची सर येणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवण्याचे काम या सरकारमधील मंत्र्यांनी केले आहे. जर महिलांच्याबद्दल अशा भाषेत बोलत असतील तर रस्त्यावर उतरुन त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. आम्ही मुख्यमंप्ती, उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की महिलांचा अपमान करणाऱया, आमच्या नेत्यांचा अपमान करणाऱयांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, त्या मंत्र्याला आयाबहिणीबद्दल कसं बोलावं. त्या मंत्र्याला कळत नसेल तर त्या मंत्र्याला राज्याचा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. तात्काळ राजीनामा घ्यावा. राजीनामा घेतला नाही तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलन करुन मंत्र्यांना रस्त्यावर फिरण्याचे अवघड केले जाईल असा इशारा दिला आहे. पूजा काळे यांनीही आपले प्रखर मत व्यक्त केले.
तेजस शिंदे म्हणाले, या खोके सरकारमधील एक मंत्री अब्दूल सत्तार यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदरनिय सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या पद्धतीवर जाऊन टिका करणे आणि शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांच्या नेत्यांनी त्यांना काय शिकवले आहे काय?, ते कोणत्या संस्कृतीतून येते हे स्पष्ट दिसून येते. त्यांनी ताबडतोब माफी मागावी, परत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याबाबत टीका केली तर जशास तसे उत्तर देवू असा इशारा देत ते म्हणाले, आजच्या परिस्थितीला शिंदे गट असू द्या, भाजपा असू द्या, यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. अजूनही महाराष्ट्रातील जनता पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारी आहे. ठाकरे साहेबांना लोकांमधून जो रिस्पॉन्स येतोय ते बघून यांची नक्कीच जमीन हलली आहे.








