मुंबई
आघाडीवरची बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयचा समभाग सोमवारी शेअर बाजारात नवी उंची गाठताना दिसला. बँकेने सप्टेंबरच्या तिमाहीत दमदार 7 हजार 627 कोटीचा नफा प्राप्त केला होता. याचा परिणाम समभागावर सोमवारी दिसला. समभाग 5 टक्के वाढत बीएसईवर 621 रुपयांवर पोहचला होता. नफ्यात जवळपास 73 टक्के इतकी दमदार वाढ दर्शवली गेलीय. उत्पन्न 35 हजार 183 कोटी रुपयांवर पोहचले आहे.









