नवी दिल्ली
प्रवासी वाहनांच्या मागणीमध्ये अलीकडे वाढ दिसत असली तरी व्यावसायिक वाहनांची विक्रीदेखील येत्या काळामध्ये वाढणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. पुढील काही वर्षांमध्ये व्यावसायिक वाहनांची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त राहणार असल्याचेही सांगितले जात आहे.
कोरोनाच्या काळामध्ये व्यावसायिक वाहनांच्या मागणीमध्ये कपात दिसून आली होती. आता संकट टळले असून सर्व व्यवसाय जोमाने सुरू झाले असून व्यावसायिक वाहनांना येत्या काळामध्ये मागणी राहणार आहे. 2023-24 मध्ये व्यावसायिक वाहनांची विक्रीची संख्या दहा लाखापर्यंत पोहचू शकते असेही म्हटले जात आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रवासावर निर्बंध घातले गेल्याने प्रवासी वाहनांची संख्या मागणीमध्ये कमी राहिली होती. अर्थव्यवस्थेने आता गती घेतली असून उद्योग व्यवसाय वाढीचा एकंदर कल पाहता व्यावसायिक वाहनांना येत्या काळात निश्चितच मागणी वाढती दिसणार आहे.
कधी किती विक्री?
सप्टेंबर 2022 मध्ये एकंदर 71,233 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली होती. जी सप्टेंबर 2021 मध्ये 59,927 इतकी होती. एकंदर विक्रीत 18 टक्के इतकी वाढ वर्षाच्या आधारावर पाहता झाली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये 41,084 व्यावसायिक वाहने विक्री झाली होती तर सप्टेंबर 2019 मध्ये मात्र 60,939 वाहनांची विक्री झाली होती.









