MLA Vaibhav Naik on the authorities due to stalled road works in Malvan
मालवण शहर ते कुंभारमाठ, मालवण-बेळणे आणि शहरातील सागरी महामार्ग मजबुतीकरणाच्या कामांना होत असलेल्या दिरंगाईवरून आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पावसाळा संपला असल्याने आता सबबी सांगत बसू नका. तात्काळ कामाला लागा, अशा सूचना नाईक यांनी केल्या. रस्त्यांच्या रखडलेल्या कामावरून ठाकरे गट शिवसेना पदाधिकारीही आक्रमक झाले होते.
मालवण/प्रतिनिधी-









