प्रतिनिधी /पणजी
गोवा दौऱयावर आलेले केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री डॉ. एल. मुरुगन आज सोमवारी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर सायंकाळी ते मुरगाव पोर्ट ट्रस्टच्याही विविध प्रकल्पांची अधिकाऱयांसमवेत पाहणी करून आढावा घेतील.
केंद्रीय मंत्री सध्या गोवा दौऱयावर असून आज सोमवारी सकाळी ते 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतील. यावेळी ते इफ्फीच्या तयारीशी संबंधित विविध विभागाचे प्रतिनिधी सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती घेणार आहेत.
दुपारच्या सत्रात डॉ. मुरुगन मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथील विविध प्रकल्पांचा आढावा घेतील. एमएफव्ही सागरीका आणि एमएफव्ही यलोफीन या सर्वेक्षणासाठीच्या जहाजांची तसेच मुरगाव बंदरात मासेमारी क्षेत्राचीही ते पाहणी करणार आहेत.









