साळ येथे पूरनियंत्रण संरक्षण भिंत, धुमासे येथे जलशुद्धीकरण प्रकल्प, आमठाणे धरण सुशोभिकरण आदींचा समावेश
वार्ताहर /लाटंबार्से
जलसंसाधन खात्यातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने मतदारसंघात तब्बल 240 कोटींच्या जलसिंचन प्रकल्प योजना, पूर संरक्षक भिंत आदी विकास योजनांना चालना देण्यात येणार असल्याचे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी सांगितले.
या अंतर्गत साळ येथे पूरनियंत्रण संरक्षक भिंत, धुमासे येथे मिनी जलशुद्धीकरण प्रकल्प, आमठाणे धरणाचे सुशोभिकरण व पर्यटन विकास, साळ नदीवर विशेष योजना आखून जल पुरवठा साठवण्यासाठी भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय अनेक भागात सिंचन व्यवस्था नेटकी करणे, शेतकरी वर्गाला विविध सुविधा देण्यासाठी योजनांना चालना दिली जात आहे. नैसर्गिक तलावांचे संवर्धन दुरूस्ती काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
वीज पुरवठा नियमित सुरळीत व्हावा पावसात व्यत्यय येऊ नये यासाठी भुयारी वाहिन्या घालणे, नवे ट्रन्सफॉर्मर्स, वीज उपकेंद्राला चालना आदी योजना आहेत, असे डॉ. शेटय़ेनी सांगितले. मतदार संघातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असुन लाट बारसे उद्योग वसाहतीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
तसेच क्रीडा संकुल उभारणे, मिनी कला भवन, डिचोली सरकारी संकुल जिथे सर्व कार्यालये एकच छताखाली येतील अशी सुमारे 80 कोटींची वास्तू उभारली जाणार असून त्याची मंजुरी मिळालेली आहे. अग्निशमन दल कार्यलयाचे कामं पुन्हा सुरु करण्यात येत आहे. सुसज्ज कदंब स्थानक कामं सुरु आहे. डिचोलीत भव्य सरकारी शाळा संकुल पूर्ण झाले असून लवकरच उदघाटन होईल. ही शाळा तालुक्मयातील आदर्श शाळा आहे. मतदार संघातस्मशान भूमी, छोटे बंधारे, मंदिर परिसर सुशोभीकरण आदी अनेक योजना चालीस लावण्यात येत असल्याचे असे डॉ. शेटय़े म्हणाले.









