चिपळूण प्रतिनिधी.
शहरातील पेठमाप येथील महिलेला जाळून तिच्या खून पकरणी पोलिसांनी तपास गतीमान केला असतानाच यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. यातूनच पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याने या खूनाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुलसुम अन्सारी (45, पेठमाप) असे मृत महिलेचे नाव आहे. कुलसूम या आपल्या मुलासोबत पेठमाप येथे रहात होत्या. त्यांच्या खूनाच्या घटनेनंतर मारेकऱयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासयंत्रणा गतीमान केली होती. यासाठी 4 पथके तसेच जवळपास 10 जणांची चौकशीही करण्यात आली होती. असे असतानाच शनिवारी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या धर्तीवर पोलिसांनी तपास यंत्रणा गतीमान केली असून यातूनच या खूनाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.