पंजाबमधील एक महिला डॉक्टर अनुभूती यांनी वयाच्या 47 व्या वषी बाईकवरून पंधरा दिवसात 5 हजार 174 किलोमीटरचे भारत भ्रमण करण्याचा विक्रम केला आहे. लुधियाना येथील रहिवासी डॉ. अनुभूती यांनी समाजहितासाठी हा प्रकल्प पूर्ण केला आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
डॉ. अनुभूती या पतीपासून वेगळय़ा राहतात. लग्नानंतर सात वर्षांनी त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच त्यांना बुलेट रायडर बनण्याची इच्छा झाली. वयाच्या 30 व्या वषी त्या बुलेट चालविण्यास शिकल्या आणि दहा वर्षाच्या सरावानंतर वयाच्या 40 व्या वषी त्यांनी भारत भ्रमण करण्याचा निश्चय केला. 47 व्या वषी त्यांनी प्रथम चंदीगढपासून आपले हे अभियान सुरू केले. पुढे जयपूर, इंदूर, अहमदनगर, महाबळेश्वर, बेळगाव, गोवा, मानेनगर, हुपरी, कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी शहरांना भेटी देत त्या पंधरा दिवसांनी चंदीगढला परतल्या. आपले हे अभियान समाजाच्या उन्नतीसाठी तसेच स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









