682 कोटी रुपयाच्या घरात नफा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पचा एकत्रित निव्वळ नफा 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या चालू
आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत नऊ टक्क्यांनी घसरून 682 कोटी रुपयांवर आला आहे. खर्चात वाढ आणि विक्रीतील घट यामुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे.
देशातील सर्वात मोठय़ा दुचाकी कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत 748 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने सांगितले की, या तिमाहीत तिचे उत्पन्न मागील वर्षीच्या याच तिमाहीत 8,539 कोटींवरून 9,158 कोटी रुपये झाले आहे. या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च नऊ टक्क्यांनी वाढून 8,292 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 7,641 कोटी रुपये होता.









