पुणे / प्रतिनिधी :
Night Marathon on December 4 in Pune पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा 4 डिसेंबरला रंगणार असून, या स्पर्धेत 15 हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटूंचा या ‘नाईट मॅरॅथॉन’मध्ये सहभाग राहणार असून, या माध्यमातून पुणेकरांना मॅरेथॉनचा थरार अनुभवायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे परदेशी पुरुष व महिला धावपटू यात भाग घेणार असून, या स्पर्धेचा प्रारंभ 3 डिसेंबर रोजी रात्री 12 नंतर (4 डिसेंबर 00:01 वाजता) होईल. या नाईट मॅरेथॉनमध्ये महिलापुरुषांचे प्रत्येकी 6 गट आहेत. पुरुष व महिला 42.195 किमीची पूर्ण मॅरेथॉन, पुरुष व महिलांसाठी अर्ध मॅरॅथॉन (21.0975 किमी) याशिवाय दोन्ही विभागांसाठी 10 किमी.,5 किमी., व्हीलचेअर (3 किमी) आणि फॅमिली रन (3 किमी) असे अन्य गट आहेत, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी ऍड. अभय छाजेड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाच्या मॅरेथॉनचे वैशिष्टय़ म्हणजे यावर्षी (सप्टेंबर 2022) लडाखमध्ये झालेल्या ‘सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2022′ मधील पूर्ण मॅरेथॉनचे पुरुष गटातील विजेते जीग्मेट नामग्याल (Jigmet Namgial) आणि पूर्ण मॅरेथॉन महिला गटातील विजेती डीक्सेट डोल्मा (Dikset Dolma) हे पुण्याच्या ‘नाईट मॅरेथॉन’मध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
अधिक वाचा : लिपीक भरती आता MPSC मार्फत
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने www.marathonpune.com येथे सुरु झालेली आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या धावपटूंनी नोंदविलेल्या वेळेनुसार त्यांना विशिष्ट गुण (पॉइंट्स) देण्यात येतील आणि पुढील वषी अमेरिकेतील शिकागो येथे होणाऱ्या WANDA WORLD CHAMPIONSHIPS MARATHON मध्ये प्रवेशासाठी या गुणांचा विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे वरील शिकागो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना सुलभता प्राप्त होईल. तसा आंतरराष्ट्रीय करार उभयातांमध्ये (पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि वांडा वर्ल्ड चॅम्पयिनशिप मॅरेथॉन, शिकागो) करण्यात आला आहे. कॉर्पोरेट अथवा ग्रूप बुकिंगसाठी ऑनलाईन पद्धतीने office.pimt@gmail.com येथे संपर्क करावा.
3 डिसेंबर रोजी रात्री 12 नंतर (4 डिसेंबर 00:01 वाजता) सणस मैदान येथून पुरुष आणि महिला 42.195 किमीची पूर्ण मॅरॅथॉन सुरू होऊन सारसबागासिंहगड मार्ग-नांदेड सिटी-नांदेड सिटीमधील आतील सर्कलला वळसा घालून पुन्हा सिंहगड मार्गावरून-सारसबागासणस मैदान ही पहिली फेरी व पुन्हा त्याच मार्गाने जाऊन त्याच मार्गाने परत सणस मैदान येथे पूर्ण मॅरॅथॉन ( 42.195 किमी) संपेल.
3 डिसेंबर रोजी रात्री 12:30 नंतर व (4 डिसेंबरच्या 00:30वाजता) पुरुष व महिलांची अर्ध मॅरॅथॉन सणस मैदानातून सुरु होऊन वरील मार्गानेच नांदेड सिटीतील आतील सर्कलला वळसा मारून त्याच मार्गे सणस मैदान येथे समाप्त होईल. याच दिवशी सकाळी 6:00 वाजता पुरुष व महिलांची 10 किमी स्पर्धा व 5 किमी स्पर्धा होईल. सकाळी 6:45 वाजता पुरुष व महिलांची व्हीलचेअर स्पर्धा होणार आहे. तर शेवटची शर्यत सकाळी 7:00 वा. फॅमिली रन (3 किमी) याच मार्गावर होईल.
पूर्ण मॅरॅथॉनच्या मार्गाची पाहणी ‘एम्स रूट मेजरर’ यांच्याकडून होणार असून मार्गावरील टेक्निकल ऑफशियल्स, पंच, मोटार सायकल पायलट्स, सायकलिंग पायलट्सण् वॉलंटियर्स, खेळाडूंसाठी स्पंजिंग आणि रिप्रेश मेंट्स पॉईंट्स, पिण्याचे पाणी, वैद्यकीय पथके आणि अँब्युलन्स, फिनिश पॉइंट येथे तात्पुरते इस्पितळ, इत्यादी सुविधा, मार्गावरील प्रकाश योजना, पोलीस बंदोबस्त, पत्रकारांसाठी सुविधा आदींची पूर्वतयारी सुरू झाली आहे.