प्रतिनिधी /पेडणे
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भाऊसाहेब बांदोडकर मोप नामकरण समितीतर्फे आज गुरुवारी दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. पेडणे सरकारी संकुलासमोर लाक्षणिक धरणे आयोजित करण्यात आले आहे.
या मागणीचे एक निवेदन उपजिल्हाधिकाऱयांना देण्यात येणार आहे. पेडणे तालुक्मयातील कूळ-मुंडकार, भाऊसाहेबांचे प्रेमी नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांनी मोठय़ा संख्येने या धरणे कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भाऊसाहेब बांदोडकर मोप नामकरण समितीचे निमंत्रक सुभाष केरकर यांनी केले आहे.









