ऑनलाईन टीम/तरुण भारत
सध्या अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. वैयक्तिक जीवनातील ताण, कमाचा ताण किंवा नकारात्मक विचार यामुळे नैराश्य येऊ शकतं. तर काही पदार्थ खाल्यानंतरही नैराश्य येऊ शकते. दुःखाची सतत भावना किंवा प्रत्येक गोष्टीत रस नसणे हे नैराश्याचे लक्षण असू शकते. हा एक मूड डिसऑर्डर आहे जो अनेक कारणांमुळे होऊ शकतो. डिप्रेशनची अनेक लक्षणे थेट जीवनसत्व आणि खनिजांच्या कमतरतेशी जोडली जाऊ शकतात. चला जाणून घ्या अशाच काही पदार्थांबद्दल, ज्यांच्या सेवनाने डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते.
साखर किंवा त्यापासून बनविलेले पदार्थ
संशोधनात असे दिसून आले आहे की पांढरी साखर किंवा त्यापासून तयार केले पदार्थ खाल्ल्याने नैराश्याची शक्यता वाढते. साखरेपासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्ल्यानंतर रक्ताच्या लेव्हलमध्ये बदल होण्याची शक्यता असते. तसेच या पदार्थांमुळे तुमच्या एनर्जी लेव्हलवर परिणाम होऊ शकतो. साखरेपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांमुळे मूड अनबॅलेन्स होऊ शकतो. त्यामुळे साखरेपासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाणे टाळावे.
प्रोसेस्ड फूड
प्रोसेस्ड फूड खाणे टाळा कारण यामुळे जास्त ताण आणि चिंता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे नैराश्य येऊ शकते. तळलेले पदार्थ, कँडी आणि हाय फॅट युक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरावर असाच परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो हे पदार्थ खाणे टाळा.
कॅफेन युक्त पेय
बहुतेक लोक जे कॅफिनसाठी संवेदनशील असतात, त्यांना डिफ्रेशन होऊ शकते. कॅफेनयुक्त पेय प्यायल्याने चिंता, तणाव आणि अनिद्रा या समस्या होऊ शकतात. कॅफेन आहारात जास्त प्रमाणात घेतले तर तुम्हाला नैराश्याच्या समस्या जाणवू शकतात. चॉकलेट, चहा आणि कॉफीमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त असते.
मद्य पेय
मद्यपान आणि धूम्रपान यामुळेही नैराश्य येऊ शकतं. अनेकांना आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे दारू प्यायची सवय लागते. दारू प्यायल्याने तुमचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. दारू ही शरीरातील सेरोटोनिन आणि न्यूरोट्रांसमीटरच्या कार्याला बदलते. त्यामुळे दोन्ही सवयी कमी करणे आणि सोडणे योग्य आहे.
मीठाचे प्रमाण जास्त असेल
आहारात मीठाचे प्रमाण जर जास्त असेल तर तुम्हाला मूड स्विंग, तणाव आणि थकवा इत्यादी समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवा.
टिप : वरील माहितीची पुष्टी तरुण भारत करत नाही. योग्य आणि अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.