उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आयोजन
Cleanliness campaign of Sindhudurg fort started in Malvan
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुक्याच्या वतीने माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे साफसफाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात महाराजांसमोर नतमस्तक होऊन या स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. तसेच माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. या मोहिमेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, महेश जावकर, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, संजय कांबळी, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले, बंड्या सरमळकर, विशाल सरमळकर, विजय पालव, महेश शिरपुटे, यशवंत गावकर, सन्मेष परब, प्रथमेश राऊत, चेतन खोत, प्रवीण लुडबे, शिल्पा खोत, सेजल परब, दीपा शिंदे, श्वेता सावंत, लक्ष्मी पेडणेकर, आकांक्षा शिरपुटे, लौकिक तळवडेकर, तनिष चव्हाण, आध्या ओरसकर, स्वरा मालंडकर, पूर्वा तळवडेकर, आहाना तळाशीलकर, पायल शिरपुटे यांच्यासह बालगोपाळ शिवजयंती उत्सव मंडळ भरडचे सभासद आणि अन्य पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले आहेत.
मालवण / प्रतिनिधी