तेलंगणात पोटनिवडणूक प्रचारादरम्यान हाणामारी
नालागोंडा / वृत्तसंस्था
तेलंगणातील पोटनिवडणुकीचा प्रचार करणाऱया टीआरएस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी हाणामारी झाली. घटना नालगोंडा येथील आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. यावेळी दोन्ही बाजूंनी लाठय़ा-काठय़ांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तेलंगणातील मुनुगोडे विधानसभेच्या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये काही कारणावरून वाद झाला.









