बंगळूर असेंद्रीय आणि भौतिक रसायनशास्त्रचे अध्यक्ष प्रा. एलांगनन अरूणन यांची अपेक्षा
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण सुविधा केंद्र (SAIF) ची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले. तसेच देशातील प्रत्येक राज्य विद्यापीठात अत्याधुनिक उपकरणे असावीत, अशी अपेक्षा बंगळूरच्या असेंद्रिय आणि भौतिक रसायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. एलांगनन अरुणन यांनी व्यक्त केली.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय प्रायोजित, शिवाजी विद्यापीठातील सैफ सेंटरच्या वतीने आयोजित स्तुति प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते. तर जयपूरमधील राजस्थान विद्यापीठाचे व मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. अरुण सावंत यांची प्रमुख्य उपस्थिती होती. स्तुतिचे समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी प्रास्ताविक केले. मंगळवारी सायंकाळी तज्ञ मार्गदर्शक व सहभागीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम हॉटेल पर्ल येथे झाला.
डॉ. सोनकवडे यांती स्तुती कार्यक्रम काश्मीरपासून सुरूवात झाली असून व्ही. आय. टी. वेल्लोर, आय. आय. टी. जोधपूर, बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विद्यापीठ लखनऊ, गोवा विद्यापीठ, आणि केरळ नंतर प्रथमच केंद्रशासित प्रदेशात म्हणजे पाँडिचेरी असा भारतभर पोहचला आहे, असे सांगत शिवाजी विद्यापीठाचा स्वतःचा परिचय करून दिला. विद्यापीठात 7 नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असून श्रीनगर, दिल्ली, बंगलोर, गोवा, मुंबई, पुणे आदी देशातील विविध भागातून 14 तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या अंतर्गत अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम देशभर राबविले जात आहेत, असे डॉ. सोनकवडे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देवून एक वेगळा आदर्श घ डवला पाहिजे, असा सल्ला दिला. तसेच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती दिली. डॉ. अरूणन आणि डॉ. सावंत यांनी दोन्ही सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्तुति प्रकल्पाचे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी डॉ. मकसूद वाईकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. के. डी. पवार, डॉ. डी. एस. भांगे यांच्यासह अन्य प्राध्यापक उपस्थित होते.









