वृत्तसंस्था/ व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या व्हिएन्ना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा अंतिम सामन्यात पराभव करून पुरुष एकेरीचे जेतेपद पटकाविले. 2022 च्या टेनिस हंगामातील मेदवेदेव्हचे हे दुसरे विजेतेपद आहे.
26 वषीय आणि माजी टॉप सीडेड मेदवेदेव्हने रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शेपोव्हॅलोव्हचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. मेदवेदेव्हने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत एटीपी टूरवरील पंधरा अजिंक्मयपदे मिळविली आहेत. कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या महिन्याच्या प्रारंभी सेऊलमध्ये झालेल्या स्पर्धेत जपानच्या निशिओकाने जेतेपद मिळविताना शेपोव्हॅलोव्हचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.









