नवी दिल्ली
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टाटा पॉवरचा सप्टेंबर 2022 अखेरचा निव्वळ नफा 85 टक्के इतका विक्रमी वाढला आहे. कंपनीने जुलै ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 935 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. याच कालावधीत एकत्रित महसूल 49 टक्के वाढत 14 हजार 163 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वषी समान अवधीत कंपनीने 9502 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. विक्रीत झालेल्या वाढीचा परिणाम नफा वाढण्यावर दिसला.









