प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयात अपघातात मृत्यू होण्याचे सञ सुरूच असून पेडणे तालुक्मयातील अपघाततात आतापर्यंत अनेकांचे मृत्यू झाले.
. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठय़ा वाहनांचे अपघातही मोठय़ा प्रमाणात होत आहेत. नईबाग पेडणे येथील महामार्गावर ट्रक व दुचाकी वाहनामध्ये रविवारी दुपारी 3 च्या सुमारास अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात सावंतवाडी तालुक्मयातील 45 वषीय दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी-माजगाव येथील ओडीसी इलेक्ट्रकि बाईक शोरूमचे मालक तथा माजी सैनिक विजय रमेश गावकर (45) हे आपल्या काही कामानिमित्त सातोसे येथे गेले होते. तेथुन आपल्या इलेक्ट्रकि बाईकने सावंतवाडीत जात असताना हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणा-या मालवाहू कंटेनर क्रमांक एन.एल.01 ए.ई6331 .यांनी दुचाकी एम.एच.07 ए .क्मयू 0395 याला सावंतवाडी दिशेने जात असलेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. दुचाकीला सुमारे दोन मीटर घोढत घेऊन मालवाहू वाहन गेले यात ते पुढच्या चाकाखाली मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच हळहळ व्यक्त होत आहे.ट्रक व दुचाकी वाहनामध्ये अपघात घडल्याची घटना घडली आहे. धडक दिलेल्या कंटेनर चालकाला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंटेनर चालकाचे नाव दिपक दुबे असून हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करुन वाहन चालकावर गुन्हा नोंद केला. आठ दिवसापूर्वी आस्कावाडा मांदे येथे दुचाकी इलेक्ट्रकि यांचा अपघात होऊन या अपघातात एक महिला जागीच ठार झाली.









