अपघात टाळण्यासाठी युवा बेळगाव फौंडेशनचे प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-चोर्ला मार्गावरील व्हीटीयूनजीक अनेक गतिरोधक आहेत. या गतिरोधकांवर पट्टे मारण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे युवा बेळगाव फौंडेशनतर्फे अपघात होऊ नयेत यासाठी गतिरोधकांवर रंगकाम करण्यात आले. तसेच पूजाही करण्यात आली.
गतिरोधक अथवा दुभाजक बांधल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने त्या ठिकाणी फलक लावण्याची गरज आहे. परंतु व्हीटीयूनजीक असे फलक नसल्याने गतिरोधक असल्याचे समजून येत नाही. यामुळे भरधाव येणारी वाहने गतिरोधकांवरून सुसाट जाताना मोठा अपघात होण्यापूर्वी या ठिकाणी फलक लावावेत, अशी मागणी युवकांनी केली.
यावेळी ऍलन मोरे, सागर शिर्के, रोहित कडगावी, चार्ली मोरे, सोनिया फ्रान्सिस, श्रीनिधी हालेप्पगोळ, कार्तिक पाटील, अंकित लाड, प्रतिक हरदी, आयन अत्तार, आदित्य एम., केदार सायनेकर यासह इतर उपस्थित होते.









