हिवाळ्याच्या दिवसात त्वचेच्या अनेक समस्या जाणवतात. यामुळे या दिवसात त्वचेची अधिक काळजी घेतली जाते.पण त्वचेची काळजी घेत असतांना सर्वात नाजूक कोणता भाग असेल तर तुमचे ‘ओठ. थंडीमुळे ओठ फुटणे ,कोरडे पडणे इतकच नाही तर ओठांमधून रक्त ही येते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी व्हॅसलीन,लिप बामचा वापर केला जातो पण तरीही आराम मिळत नाही. अशावेळी फाटलेले ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा वापर करू शकता. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
फाटलेल्या ओठांपासून आराम देण्यासाठी बदामाचे तेल खूप उपयुक्त आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने ओठांचा मसाज केल्यास ओठांना ओलावा मिळतो तसेच त्वचा मुलायम आणि गुलाबी होते. लोणी आणि तूप हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. रोज रात्री झोपताना ओठांना तूप किंवा लोणी लावल्यास ओठ मऊ होतात. फाटलेल्या ओठांवर व्हॅसलिन आणि एरंडेल तेल एकत्र करून ओठांचा मसाज केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. एक चमचा गुलाब पाण्यात ग्लिसरिन टाकून हे मिश्रण दिवसातून २-३ वेळा ओठांना लावावा.यामुळे ओठांचा कोरडेपणा कमी होतो. लोणी आणि मीठ एकत्र करून लावल्यास ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.फाटलेल्या ओठांवर मध देखील उत्तम पर्याय आहे. मध लावल्याने ओठ मुलायम होतात.
यामुळे थंडीच्या दिवसात जर ओठांची समस्या जाणवत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून पाहा.यामुळे तुम्ही तुमच्या ओठांची सुंदरता सहज वाढवू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









