नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
मतदानाच्यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर उमेदवाराचा पक्ष किंवा चिन्हाच्या जागी त्याचे शिक्षण, वय आणि पात्रता तसेच तसेच त्याचे छायाचित्र प्रदर्शित करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर झाली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्मयता आहे. आपण ज्या व्यक्तीस मतदान करीत आहोत, त्या व्यक्तीची योग्यता काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार मतदाराला असला पाहिजे. पक्षाचे चिन्ह आणि नाव या बाबी उमेदवाराच्या योग्यतेपेक्षा गौण आहेत. त्यामुळे उमेदवाराची माहिती मतदाराला मतदान करण्याच्यावेळी समजणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.









