आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरीतील साहिल मोरे याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या ‘त्या’ मैत्रिणीवर आता अटकेची टांगती तलवार उभी ठाकली आह़े. साहिल याच्या बहिणीकडून शहर पोलिसांत मैत्रिणीविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी मिताली अरविंद भाटकर (वय 24, रा. तोणदे, रत्नागिरी) या मैत्रिणीविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा. आता पोलिसांकडून कोणत्याही क्षणी मितालीला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े.
दरम्यान, साहिल विनायक मोरे (वय 22, रा अलावा, रत्नागिरी) या तरूणाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर आत्महत्या केली होत़ी. घटनेच्या दिवशी सकाळी साहिल याच्यासोबत त्याची मैत्रिण मिताली ही देखील फ्लॅटवर होत़ी. मितालीला साहिल याने फ्लॅटच्या किचनमध्ये गळफास घेतल्याचे आढळून आल़े. साहिलने गळफास घेतलेला पाहून मितालीने साहिल याच्या बहिणीला फोन केला. यानंतर मितालीने साहिल याच्या मानेभोवती असलेली दोरी चाकून कापून मृतदेह खाली उतरवला होत़ा. तसेच साहिलची बहीण व मित्राच्या मदतीने साहिल याला प्रथम खासगी रूग्णालय व नंतर जिल्हा रूग्णालय येथे दाखल केल़े. यावेळी जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साहिल याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, साहिल व त्याची मैत्रिण मिताली हे दोघेही रत्नागिरीमधील वाहन विक्रीच्या शोरूममध्ये कामाला होत़े. येथे त्यांच्यात ओळख होवून नाजूक मैत्रीचे संबध निर्माण झाले. रत्नागिरीमधील साईभूमीनगर येथे मिताली व साहिल यांच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर त्यांची वारंवार भेट होत अस़े. सर्व काही ठीक चाललेले असताना मागील काही दिवसांपासून त्यांच्या मैत्रीमध्ये कटुता आल्याने त्यांच्यात वारंवार वादाचे प्रसंग निर्माण झाले होत़े.
दरम्यान, साहिलने मिताली हिला लग्न करण्यासंबंधी विचारणा केली होत़ी. पण मितालीने लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला होत़ा. 2 वर्षाचे संबंध तुटण्याच्या मार्गावर आल्याने साहिल याला मोठा धक्का बसला. असे असतानाही साहिल हा वारंवार लग्न करण्यासंबंधी मिताली हिला विचारणा करत होत़ा. मात्र मिताली हिने आपल्याला तुझ्याशी लग्न करावयाचे नसल्याचे सांगितले होत़े. लग्नाला मिताली ही नकार देत असल्याने आपली बदनामी होईल, या भीतीने साहिल याने गळफास घेवून आत्महत्या केली, अशी तक्रार साहिल याची बहिण कृतिका विनायक मोरे हिने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केल़ी.
तर साहिल याने गळफास घेवून आत्महत्या केली, असे मानण्यास नातेवाईकांकडून नकार देण्यात आला होत़ा. साहिल याच्याबाबतीत काही घातपात झाला असावा, असे कुटुंबियांकडून मानले जात होत़े.घरातून निघताना साहिलच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताणतणाव दिसत नव्हता, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. दरम्यान साहिलने आत्महत्याच केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल़े. यानंतर बहिणीने साहिल याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी साहिल याची मैत्रिणी मिताली हिच्याविरूद्ध पोलिसांनी भादंवि कलम 306 नुसार गुन्हा दाखल केल़ा.
मिताली हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला भादंवि कलम 306 नुसार अजामीनपात्र व दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा आह़े. यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद करण्यात आली आह़े. तसेच या गुन्ह्याखाली व खटला सत्र न्यायालयात चालवला जात़ो.









