खातेधारकांना मोबाईलद्वारे खात्यामध्ये पैसे जमा करण्याची संधी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी अर्बन कॉपरेटिव्ह पेडिट सोसायटी गोव्यातील अव्वल क्रमांकाची संस्था आहे. या संस्थेने सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या संस्थेने आपल्या ग्राहकांसाठी क्मयूआर कोड जारी केला असून आता ग्राहकांना खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी प्रत्यक्ष शाखेमध्ये जाणे गरजेचे नाही. ऑनलाईन पैसे या संस्थेच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहेत. त्याचा शुभारंभ नुकताच संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन ऍड. यशवंत गावस, संस्थेचे संचालक वासुदेव परब, सपना परब, ऍड. काशिनाथ माळशेकर, कृष्णा गावस श्रीपाद सावंत, गोविंद कोरगावकर अक्षदा गावस, संस्थेचे कार्यकारी संचालक लक्ष्मण गावस सरव्यवस्थापक अनंत गावस, तांत्रिक विभागाचे केशव चव्हाण सुनील पर्येकर व इतरांची उपस्थिती होती.
ऍड. यशवंत गावस सांगितले की, संस्थेने शून्यातून विश्व निर्माण करण्याचे काम केलेले आहे. प्रामाणिक कार्य व कर्मचाऱयांच्या सहकार्यामुळे या संस्थेने अल्पावधीत भरारी मारली. 25 वर्षांमध्ये या संस्थेने बारा शाखा सुरू केलेले आहेत. ग्राहकांचा व सभासदांचा वाढता पाठिंबा या संस्थेला लाभत असल्यामुळे त्यांना आधुनिक सेवा देण्याचे उद्दिष्ट या संस्थेने सुरुवातीपासून ठेवलेली आहे. आता नवीन तंत्रज्ञानाच्या प्रवाहामध्ये सामील होताना या संस्थेने ग्राहकांसाठी व सभासदांसाठी क्मयू आर कोड उपलब्ध केलेला आहे. याद्वारे राज्य किंवा परदेशातून संस्थाचे ग्राहक आपला व्यवहार करू शकतात असे यावेळी त्यांनी सांगितले.









