रामपूर
सपा नेते आझम खान यांचे विधानसभेचे सदस्यत्व शुक्रवारी संध्याकाळी रद्द करण्यात आले. रामपूर न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी ही कारवाई केली. यानंतर रामपूर विधानसभेची जागा रिक्त झाली. गुरुवारीच आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षेच्या सुनावणीनंतर त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु शिक्षेची अधिकृत प्रत मिळाल्यानंतरच सभापतींनी रामपूर विधानसभा जागा रिक्त घोषित केली. आता सहा महिन्यांत रामपूर विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात आझम खान यांना रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच न्यायालयाने त्यांना दंडही ठोठावला. मात्र, शिक्षा सुनावणीनंतर त्यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर जामीन मंजूर करण्यात आला होता. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 7 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.









